Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयAmbadas Danve on School Uniform : "पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या...

Ambadas Danve on School Uniform : “पहिल्याची बाही दुसऱ्याला अन् खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला…”; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केले आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

‘चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दीपक केसकर… विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे’, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुढे त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले की, १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांच्या निकृष्ट गणवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका…..अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही .

सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित #quality बघ” असं तुम्ही म्हणाला होतात, आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची quality? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का ? असो गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...