मुंबई | Mumbai
सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्षांची बैठक बंगळुरुत पार पडली. या पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीचे नाव INDIA असं आहे. मी जे दोन शब्द बोललो त्यात मी विशद केले आहे की एका पक्षाविरोधात किंवा व्यक्ती विरोधात नाही. तर हुकूमशाहीच्या विरोधात आहे.आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच अजित पवारांचे कौतुकही केले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज विधानभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. विधानभवनातील केबिनमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेही यावेळी त्यांच्यासोबत होते.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
तसेच ठाकरे म्हणाले की, पाऊस सुरु झाला आहे, पूर स्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे हवालदिल होईल. मात्र सत्तेची साठमारी सुरु आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही मी अजित पवार यांना केली आहे. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
या भेटीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राज्यासाठी चांगले काम करावे असे मी त्यांना म्हटले आहे. त्यामध्ये राज्याचे प्रश्न मागे पडत आहे.अजित पवारांसोबत मी अडीच वर्ष काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. इतरांची जरी सत्तेसाठी धावपळ चालू असली तरी त्यांच्याकडून राज्यातील जनतेला वेळेवर मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा त्यांच्याकडे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हटले.
नमामी गंगे प्रकल्पाच्या साईटवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; १५ जणांचा मृत्यू, ७ जखमी
मी किळसवाणे व्हिडिओ बघत नाही
विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”मी असे किळसवाणे आणि विभत्स व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटत त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे.”
ही हुकूमशाही विरोधातली लढाई
उद्धव ठाकरेंनी बंगळुरुत झालेल्या बैठकीबद्दल बोलताना सांगितले की, “काल आणि परवा दोन दिवस बंगळुरुत देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली. देशप्रेमी आणि लोकशाही पक्षांची आघाडी झाली आहे. ही लढाई एखादी व्यक्ती किंवा पक्ष नाही तर हुकूमशाही विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री येत जात असतात पण जो पायंडा पडत आहे तो घातक आहे. त्यामुळे देशप्रेमी, लोकशाही पक्ष एकत्र येऊन त्याविरोधात लढत आहेत”.