Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजBadlapur Girls Assault : "लाडक्या बहिणींच्या छोट्या मुलीही…."; बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा...

Badlapur Girls Assault : “लाडक्या बहिणींच्या छोट्या मुलीही….”; बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये (Badlapur) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (School Sexual Assault Case)

या दुर्देवी घटनेनंतर आज (दि. २० ऑगस्ट) सकाळपासून हजारो बदलापूरकर नागरिक (Citizen) रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पालकांनी या शाळेबाहेर आंदोलन देखील सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे. आपल्याकडे अशी पद्धत सुरु झालीय की अशा घटनांचे राजकारण केलं जात आहे. लाडकी बहीण योजना आणत असताना लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. एखाद्या राज्यात काय देशात कुठेही अशाप्रकारची घटना होता कामा नये.”

हे देखील वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरण! डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं

तसेच, “या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला वेळ लागला. एखाद्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या घटनेसाठी ते गुन्हेगार जबाबदार असतात तसेच त्यावर न्यायनिवाडा करुन शिक्षा देण्यात दिरंगाई करणारे देखील जबाबदार धरले पाहिजेत. हे झालं तर अशा गोष्टींना आळा बसेल. कुठेही काही घडलं तरी कोणीही सुटता कामा नये. सगळेजण पक्ष जात पात विसरून एकत्र झाले तरच आपल्या राज्यातील महिला सुरक्षित राहतील. तरच आपण माझ्या राज्यातील महिला ही लाडकी बहीण आहे असं म्हणू शकतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“शक्ती विधेयक कायदा आम्ही आणू शकलो नाही कारण गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं गेलं. ज्यांनी गद्दारी केली त्यांची जबाबदारी आहे या शक्ती कायद्याची शक्ती गुन्हेगारांना दाखवून देण्याची. मला असं कळलं आहे की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबधित होती. याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. जर का हा भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडून निबंध लिहून सोडून देणार आहात का? कुठेही राजकारण न करता कारवाई झाली पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर उतरले

बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहे तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. खरं सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार ठरला! कोअर कमिटीच्या बैठकीत ‘या’ नेत्याच्या नावावर एकमत

तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवर उडाला आहे पोर्षे कारचे प्रकरण, वरळीतील वीरशहाचं आणि पनवेल ची घटना असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहे अस टोला त्यांनी लगावलाय. महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या, तुम्हाला खरच लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या सुरक्षित असेल तरच त्यांना अश्वस्त वाटेल अस सुषमा अंधारे यांनी म्हटलय.

- Advertisment -

ताज्या बातम्या