Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई | Mumbai

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले.

- Advertisement -

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, ‘एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.’

तसेच, ‘यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं.

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

‘फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं,’ असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.

नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

‘महिलांचा सन्मान करणारं ठाणे, दिघे साहेबांचं ठाणे, सुशिक्षित लोकांचं ठाणे अशी ठाण्याची ओळख होती. ती आता गुंडांचं ठाणे अशी ओळख होऊ लागली आहे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागलीय. एक गोष्ट मिंधे गटानं लक्षात घ्यावी की आम्ही आमच्यावरील संस्कारांमुळे शांत आहोत. पण जर ठरवलं तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो;, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या