Thursday, March 13, 2025
HomeराजकीयUddhav Thackeray : "बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, अन्यथा…"; उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray : “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, अन्यथा…”; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.

- Advertisement -

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना आणि अपक्षांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम ठाकरेंनी दिला.

दोन दिवसांपासून आम्ही आमच्या पक्षातील बंडखोरांना सूचना देत आहोत. काहींनी अर्ज मागे घेतले आहेत. तीन वाजल्यानंतर कुणी मागे घेतले कुणी मागे घेतले नाहीत, चित्र स्पष्ट होईल. पण जर कुणी सांगून अर्ज माघारी घेतला नाही, तर पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सर्वांना आमच्या सूचना गेल्या आहेत. ३ वाजता चित्र स्पष्ट होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, शेतकरी कामगार पक्षासोबत आमची चर्चा झाली.जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली. अलिबाग, पनवेल आणि पेणमध्ये शेकपा लढेल. आम्ही उरणमध्ये लढत आहोत. इतर तीन ठिकाणाचे आम्ही अर्ज मागे घेणार आहेत. तीन वाजता चित्र स्पष्ट होईल. जर अर्ज मागे घेतले नाहीत,तर तर काय करायचे ते आम्ही ठरवले आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...