Thursday, November 14, 2024
HomeनगरUddhav Thackeray On Old Pension Scheme : सरकार आणा, जुनी पेन्शन योजना...

Uddhav Thackeray On Old Pension Scheme : सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; कोपरगावमध्ये उद्धव ठाकरेंचा कर्मचाऱ्यांना शब्द

कोपरगाव | Kopergoan

जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena UBT Chief) पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray) सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.

- Advertisement -

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, ही जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून खेचून आणू. तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता, तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हेत, निवडणुका जवळ आल्या की यांनी लाडकी बहीण योजना काढली, असा टोला त्यांनी लगावला आहे. करोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जिवावर उदार होऊन कामे केलीत म्हणून महाराष्ट्र वाचला आहे. तरी सुद्धा हे सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही. आपले सरकार पुन्हा आणा, आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला कोणीही सत्तेतून काढू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचेकडे कुठे सत्ता होती, पण तरी त्यांच्याकडे सत्ता होती, जनतेची सत्ता होती. तशीच ही जनताच माझी सत्ता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, कर्मचाऱ्यांनी साथ दिली नाही तर सरकारच चालू शकत नाही. तुम्ही घरोघरी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम करता मात्र श्रेय हे घेतात आणि म्हणतात सरकार आपल्या दारी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही. मी विचार करत बसलोय की, तुम्ही मला काय म्हणून बोलावलं? माझा येथे उल्लेख झाला की, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरला. चिन्ह चोरलं आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागत आहात. मला दिवार चित्रपटातील डायलॉग आठवला.

मिंधे वगेरे मला सांगत आहेत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, तेरे पास क्या है? मग अमिताभ बच्चन म्हणाले होते मेरे पास मा है, तसंच मी सांगतोय मेरे पास ईमान है, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की, माझ्याकडे आज काहीच नाही. तरी देखील तुम्ही मला बोलावत आहात आणि मी सुद्धा आलो आहे. कारण मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या