Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत लाॅन्च; उद्धव...

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत लाॅन्च; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansbha Election) रणधुमाळी सुरु झाली असून अवघ्या काही दिवसांतच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत घटनास्थापनेच्या मुहूर्तावर या गाण्याचे अनावरण केले. नंदेश उमप यांनी गायलेल्या ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणं ऑडिओ स्वरूपात आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजकीय विषयांवर भाष्य करणे टाळले. मात्र, या विषयावर दसऱ्याला (Dasara) भाषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आजपासून नवरात्री (Nvratri) सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे. आजची पत्रकार परिषद (Press Conference) राजकीय नाही. मात्र, राज्यात जे अराजक माजले आहे,त्यावर एक गाणं आले आहे. राज्यात जी तोतयेगिरी सुरू आहे, त्या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी जगदंबेसाठी अराजकीय गाणं तयार केले आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “गेली दोन वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत. न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, मात्र तरी न्याय मिळत नसल्याने हात दुखायला लागले आहेत. त्यामुळे शेवटी जगदंबेलाच साकडं घातलं पाहिजे की आता तु तरी दार उघड.महिलांवरती अत्याचार होत आहे. मला खात्री आहे मनापासून हाक मारली की भक्तांच्या हाकेला आई धावून येते”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच हे गाणं नंदेश उमप (Nandesh Upam) यांनी गायलेलं आहे.तर हे गोंधळ गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे.तीन महिन्यांपूर्वीच नंदेश यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांनी गायलेले हे पहिलेच गाणं असून त्यांचा पहाडी आवाज आताही अगदी तसाच आहे, असेही ठाकरे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या