Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane: "उध्दव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करु शकतो"; मंत्री नितेश...

Nitesh Rane: “उध्दव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करु शकतो”; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक विधान

तुळजापूर | Tuljapur
एकीकडे राज्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. एकेमागून एक निरोप येऊन धडकत आहेत. तर उद्धव ठाकरे म्हणतात तसा उभा महाराष्ट्र, मनसे-उद्धव सेनेच्या युतीची बातमी कधी धडकते याची आतुरतेने वाटत पाहत आहे. नेमके त्याचवेळी मंत्री नितेश राणेंच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं धक्कादायक विधान मत्स्यविकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. मिठी नदीच्या गाळ सफाई घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने डिनो मोरीआची चौकशी सुरु केली असल्याच्या प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो अस म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ठाकरे बंधुच्या एकत्रीकरणाची चर्चा असल्याचाही राणे म्हणाले.

डिनो मोरीआच्या घरावर ईडीचा छापा
डिनो मोरीयाच्या घरी शुक्रवारी मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिवसभर चौकशी केली. तसेच मुंबईत १५ विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू झाली. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली आहे. आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते. या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज-उद्धव युतीची उडवली खिल्ली
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चेची नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी या दोघांच्या युतीवर खिल्ली उडवली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Delhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

0
नवी दिल्ली | New Delhi सध्या देशभरात उष्णतेने (Heat) कहर केला आहे. दिवसांदिवस तापमान वाढत असल्याने या उकाड्यापासुन बचाव करण्यासाठी अनेक घरांमध्ये पंखा किंवा एसी...