Thursday, May 15, 2025
HomeराजकीयUddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराचे केलं समर्थन; म्हणाले, "जे गद्दार ते...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराचे केलं समर्थन; म्हणाले, “जे गद्दार ते गद्दारच, गाण्यात…”

मुंबई । Mumbai

- Advertisement -

स्टॅँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये एकनाथ शिंदेंवरील व्यंगात्मक गाणं सादर केलं आणि एकच गदारोळ माजला. या विडंबनात्मक गाण्यातील टिप्पणीमुळे शिवसैनिक तसेच सत्ताधारी नेतेही आक्रमक झाले असून काल शिवैसनिकांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोडही केली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी उद्धव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खरमरीत टीकाही केली आहे.

णाल कामराने काहीही चुकीचं केलेलं नाही. कुणाल कामराने सत्य मांडलं. जे चोरी करतात ते गद्दारच अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. सत्य बोलणं हा स्वातंत्र्यावरील हल्ला नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलं आहे. आम्ही आज पण बोलतोय चोरी करणारे गद्दार आहे. शिवसैनिकांनी तोडफोड केली नाही. गद्दार सेनेच्या एसएनसीच्या लोकांनी केले असेल. भेकड लोकांना आपल्या नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड केली . कामरांनी जनभावना व्यक्त केल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, ही राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललेलं आहे की, गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरुन त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही. कोशारी यांनी अपमान केला तेव्हा त्यांचा निषेध करण्याचं धाडस नव्हतं. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहे. त्यामुळे कुणाल कामराने अयोग्य केलं असं मला वाटत नाही. त्याने जनभावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात. तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओचं ज्यांनी नुकसान केलं त्यांचीही भरपाई द्यायला हवी. तोडफोड करणारे जे भामटे, भेकड, गद्दार लोक आहेत त्यांच्याकडे दामदुपटीने वसुली करावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केली आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, “सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला असू शकत नाही. आम्ही तर उघडपणे हे गद्दार आहेत असं म्हणत आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गद्दारांच्या बाबतीत म्हणू शकत नाही. मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं राज्यात काही चालत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो चिरडून काढला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...