Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याShivsena Crisis : उद्धव ठाकरेंना 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' परत मिळणार?

Shivsena Crisis : उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ परत मिळणार?

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तसेच पक्ष संघटना ही एकनाथ शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा काही महिन्यांपूर्वी दिला. मात्र, त्याला आव्हान देणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज ही याचिका दाखल करून घेत 31 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिलेले आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाने आपल्या याचिकेत काय म्हटलं?

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव देऊन चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ नुसार दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, असा दावा ठाकरे गटानं याचिकेतून केला आहे. आयोगानं विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट म्हणून स्विकारणं चुकीचं आहे, असंही ठाकरे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

VIDEO : “…पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार लाड यांनी अरविंद सावंतांना दिली थेट ‘वॉर्निंग’

मुंबई निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तसेच पक्ष संघटना ही एकनाथ शिंदे गटाची असल्याचा निकाल काही महिन्यांपूर्वी दिला. मात्र त्याला आव्हान देणारी याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे दिलेले आहे. शिंदे यांचे पक्ष संघटनेतील बहुमत विधिमंडळातील बहुमत पाहून निवडणूक आयोगाने आपला अधिकार वापरून पक्ष संघटना आणि पक्ष चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथशिंदे गटाचे होते हा दावा मान्य केला. तसा निकालदेखील निवडणूक आयोगाने दिला.

NCP Crisis : राज्यभरात माफी मागत फिरणार का? भुजबळांचा पवारांना खोचक सवाल

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी हरकत घेतली. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यावर आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबान हे पक्षचिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या