Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला;...

Uddhav Thackeray : मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “सर्वांना…”    

मुंबई | Mumbai

येत्या रविवारी (दि.३०) रोजी म्हणजेच गुढीपाडव्याला मनसेचा (MNS) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मेळावा पार पडणार आहे. नुकताच या मेळाव्याचा टीझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मनसेच्या एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत.

- Advertisement -

अनेक वर्षांनी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray’s) फोटो नव्हता. याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षा सोडल्यावर मनसे स्थापन केली होती. त्यावेळी बाळसाहेब स्वत: म्हणाले होते की, माझा फोटो वापरायचा नाही, त्यानंतर मनसेच्या बॅनरवर फोटा दिसला नव्हता. मात्र यंदाच्या मेळाव्याआधी टीझरमधील बॅनरने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत उद्धव ठाकरेंना आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसतं आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही.” असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला आहे. त्यानंतर आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यावरुन काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

तसेच “मी उघडपणे सांगतो आहे की शिवसेना यूबीटी वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे. जी काय दुसरी आहे ती गद्दार सेना आहे. जी तोडफोड कुणाल कामरा जिथे होता तिथे झाली त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही. ती गद्दार एसंशि सेना आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM) बचाव कुणाचा केला? तर ज्याचं नाव नाही घेतला त्याचा. एसंशिची बदनामी झाली असं त्यांना वाटत असेल तर याचा अर्थ एसंशि गद्दार आहे.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhushansingh Raje Holkar : “… तर आम्ही सहन करणार नाही”; वाघ्या...

0
पुणे | Pune वाघ्या कुत्र्याच्या रायगड किल्ल्यावरील स्मारकावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र (Letter)...