Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याIrshalwadi Landslide : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत, ग्रामस्थांना धीर देत दिलं ‘हे’ आश्वासन;...

Irshalwadi Landslide : उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत, ग्रामस्थांना धीर देत दिलं ‘हे’ आश्वासन; म्हणाले…

मुंबई । Mumbai

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त इर्शाळवाडी येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मदत कार्याचा आढावा देखील घेतला. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देखील दिला आहे. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील उपस्थित होते.

- Advertisement -

या घटनेचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले, मी देखील राजकारणी आहे. परंतु इर्शाळवाडीची ही घटना राजकारणी म्हणून सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज अशा अनेक वसत्या आहेत, ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि तिथे दरड कोसळ्याची भीती आहे. या वसत्यांचे वेळी स्थलांतर व्हायला हवं. मी या लोकांना भेटलो, पण त्यांना भेटून सांगू तरी काय. अशा घटना टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन याबाबत काम करायला हवं. देशाच्या स्वांत्र्याला ७५ वर्षे होऊनही आज अदिवासी, प्रकल्पग्रस्तांना असं जिवन जगावं लागतंय. यासाठी इर्शाळावाडीच नाही, तर अजुबाजुच्या काही वस्त्यांशी बोलून मी व्यवस्था निर्माण करण्याविषयी बोलणार आहे.

ही दोस्ती तुटायची नाय! फडणवीस-अजित पवारांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; बॅनरवर पहाटेच्या शपथविधीच्या फोटोचाही समावेश

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अशा धोकादायक वसत्यांसाठी एखादी योजना तयार करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही असो ती योजना सुरु राहायला हवी. आपण राजकारणी म्हणून त्यांच्याकडे मतदान मागायला जातो, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा धोकादायक वसत्यांच्या तेथील नागरिकांशी चर्चा करून स्थलांतर करायला हवं आणि तीन चार वसत्या मिळून एखादं गाव वसवलं जाऊ शकतं. तसेच, मी मदतकार्याचा आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. परंतु घटनास्थळी जाणं मी टाळणार आहे. कारण मी गेलो तर काही लोक माझ्यासोबत येतील आणि त्यामुळे मदतकार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होईल असं कुठलंही काम मी करणार नाही. दुर्घटनाग्रस्त लोकांना कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा जिथे उदारनिर्वाहचे साधन आहेत तिथे हे कंटेनर ठेवायाल हवे असे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान ही दुर्घटना घडून आज तीन दिवस झाले असून तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी एनडीआरएफच्या (NDRF) जवानांकडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे इर्शाळगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत एनडीआरएफसह इतर संस्थांकडून याठिकाणी मदतकार्य सुरु असून दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे कुटुंबीय आणि शेजारच्या गावातील नातेवाईक तीन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला असून यात ९ पुरुष, ९ महिला आणि चार बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर गावात राहणाऱ्या ४८ कुटुंबातील २२८ नागरिकांपैकी १४३ व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून आतापर्यंत ११० लोकांची ओळख पटली आहे. याशिवाय अजूनही ७० ते ८० लोकांचा (People) शोध लागलेला नसून ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या