Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याMLA Disqualification Case : आमदार अपात्रतेची सुनावणी एकदिवस आधीच होणार, कारण काय?

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेची सुनावणी एकदिवस आधीच होणार, कारण काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी उद्या म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यापूर्वी शिवसेना आमदार अपात्रेतसंदर्भातील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती. पण राहुल नार्वेकरांना दिल्लीतील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने एक दिवस आधी म्हणजे उद्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी स्वत: आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले, “दिल्लीत एका कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण आल्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे आवश्क आहे. यामुळे मी आमदार अपात्रतेची सुनावणी ही परवा घेणार होते. पण आता ही सुनावणी उद्या म्हणजे 12 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. मला आमदार अपात्रतेविषयात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आणि लवकरात लवकर निर्णय घेईचा आहे. मला कोणताही वेळ वाया घालवायचा नाही म्हणून एक दिवश आधी ती सुनावणी घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली आहे.

अशी असेल आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी

१२ तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल.

१२ ते २० ऑक्टोबर दरम्यान शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

२० ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

२७ ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडतील.

६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

१० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

२० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

२३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या