Friday, March 14, 2025
Homeमुख्य बातम्या''तेव्हा उध्दव ठाकरेंची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती''...; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

”तेव्हा उध्दव ठाकरेंची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती”…; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२१ मधील एका (Uddhav Thackeray and Narendra Modi Meeting) भेटीचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government)असताना पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत जाण्याची (Uddhav Thackeray Wished To Go with BJP Again) इच्छा होती. त्यांचे मन विचलित झाले होते असे स्वत: संजय राऊतांनी अजितदादांच्या बैठकीत सांगितले होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी (NCP Ajit Pawar State President Sunil Tatkare) केला आहे.

- Advertisement -

सुनील तटकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी २०२१ मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर माझी संजय राऊतांबरोबर बैठक झाली तेव्हा मला कळले की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली.”

Operation Ajay : ‘ऑपरेशन अजय’ सुरू! इस्राइलच्या युद्धभूमीतून २१२ भारतीय परतले मायदेशी

ती भेट घेतल्यानंतर सतत ४-५ दिवस संजय राऊतांचा माझ्याकडे आग्रह होता. अजित पवारांची भेट घेऊन काही चर्चा करायची होती. एकदा भेटीची वेळ ठरली परंतु काही कारणास्तव दादांना तिथे पोहचता आले नाही. अजितदादा न आल्याने संजय राऊतांना वाईट वाटले होते. काही रागही आला होता. पण त्यानंतर २ दिवसांनी पुन्हा अजित पवार, संजय राऊत आम्ही एकत्र बसलो होतो.

त्यात एकनाथ शिंदे, उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. चर्चा सुरु असताना पंतप्रधानांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मन विचलित झाले आहे. आपण पुन्हा भाजपासोबत जावे असे उद्धव ठाकरेंना वाटतेय. त्याबाबत पुष्टी एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरांना करायला लावली. तास दीड तास सखोलपणे चर्चा केली. उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. या बाबत उध्दव ठाकरे स्वतः सांगतील.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीक्षेत्रात उन्नती साधावी : राज्यपाल रमेश बैस

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनवले तेव्हा आणि त्यानंतर सातत्याने अजित पवार उत्तमप्रकारे काम करत होते. अजितदादांशिवाय महाविकास आघाडीचे सरकार चालू शकत नाही असे संजय राऊत बोलायचे. अनेकदा माझ्याशी संपर्क साधायचे. दादांच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या प्रशासन कौशल्यामुळे कोविड काळात सरकार अतिशय उत्तम चालले असे म्हणायचे.

दरम्यान, आता सिंचन घोटाळ्यावरून संजय राऊत आरोप करतायेत. परंतु कुठल्याही तपास यंत्रणेत मी किंवा अजितदादा दोषी आढळलो नाही. कधीही आरोपी केले नाहीत. संजय राऊत तुम्ही आरोपी आहात. तुम्ही अटकेत होता, जामिनावर बाहेर आला आहात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांवर बोलायचा नैतिक अधिकार नाही असा टोलाही तटकरेंनी संजय राऊतांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांना इशारा देत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही बैठक दिल्ली भेटीनंतर १५ दिवसांनी झाल्याचेही तटकरेंनी नमूद केले. तसेच संजय राऊतांनी आमच्यावर टीका करावी, मात्र भाषा विचार करून वापरावी, असा इशारा दिला. राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर अनावश्यक टीका करण्याची गरज नाही, असेही तटकरेंनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : विधानसभा तिकीटाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विलास भुजबळ (वय 42 रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता,...