Sunday, December 15, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरेंना अजून एक धक्का! मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त कसबा-चिंचवड निवडणुकीपर्यंतचं...

ठाकरेंना अजून एक धक्का! मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त कसबा-चिंचवड निवडणुकीपर्यंतचं…

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आपण लवकरात लवकर कोर्टात जाणार, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

- Advertisement -

याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाला मिळालेले ताप्तुरते मशाल चिन्ह आणि पक्षाचे नाव आता फक्त कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरतं दिलं होतं. २६ फेब्रुवारीपर्यंतच हे नाव वापरण्याची मुदत ठाकरे गटाला देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ‘मातोश्री’वर बोलावली तातडीची बैठक

म्हणजे चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच ठाकरे गटाला पक्षाचं हे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं… शिवसेना भवनाचं काय?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

नेमके प्रकरण काय?

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले. आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीही हेच चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली होती.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटला, कार दुभाजकावर आदळली, एअर बॅग उघडले पण…

दरम्यान, समता पक्षानेही मशाल हे चिन्ह आपल्याला द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास झा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. त्यामुळे आता आमचे मशाल चिन्ह आम्हाला द्यावे, असे म्हटले आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

धक्कादायक! शिर्डीला सहलीला आलेल्या विद्यार्थांना विषबाधा, तब्बल शंभर मुले रूग्णालयात

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या