Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्या"देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं"; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला ...

“देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

काल शिवसेना ठाकरे गट (ShivSena Thackeray Group) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडली. यावेळी हिंदुत्व आणि घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपवर (BJP) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या याच टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे…

- Advertisement -

राज्यात पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करताना, ते केवळ मस्टरमंत्री का, असे म्हणत वाढीव उपमुख्यमंत्रीपदाच्या संख्येवरुन टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकाने मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. नरेंद्र मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं, असा पलटवार बावनकुळेंनी केला आहे.

अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल! १३६ दिवसांनी संसदेत येणार

बावनकुळेंनी पुढे म्हटले की, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचे (Ram Temple) भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारने राज्यभर गुन्हे दाखल केले होते. हे तुम्ही विसरलात की काय?, असा प्रश्न बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात याचिका दाखल

तसेच औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसले आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिले आहे”, अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मातोश्री निवासस्थानी आढळला विषारी ‘कोब्रा’; सर्पमित्रांनी यशस्वी केले रेस्क्यू

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...