Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याUddhav Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज मागे घेतल्यानंतर...

Uddhav Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

यंदा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Uddhav Thackeray’s ShivSena) दसरा मेळावा (Dasara Melava) होणार कि नाही? याबाबत सांशकता होती. शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा व्हावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने आणि ठाकरे गटाने आग्रह धरला होता. पंरतु, शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण

आज मातोश्री येथे पारंपरिक वेशभूषेत तीर्थक्षेत्रातील सेवेकरी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील. यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्ही सुद्धा या दसरा मेळाव्याला या असे आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिले. तसेच खोक्यातून तुम्ही सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) टोला लगावला.

पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज माफिया भूषण पाटीलसह साथीदाराला वाराणसीतून अटक

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “भाजपने जर नंदी बैलाला विचारलं की पुन्हा एकदा त्यांचे सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की शंभर टक्के नंदी बैल नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही. तुम्ही सगळे जण एकत्र या, ससंस्कृती पुढे नेण्यासाठी आपण एक मेळावा लवकरच घेऊ, असे त्यांनी म्हटले. तसेच आजचं वातावरण पाहिलं तर तुमचा आशीर्वाद मला महत्त्वाचा वाटतो. अलिकडे परंपरा नष्ट होत आहेत. तुम्ही संस्कार देणारी माणसे आहेत. राज्यातील मंत्र्यांचे (Ministers) रुसवे फुगवे सुरू आहेत, मंत्री नाराज आहेत. पण तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी मंत्री नाराज झालाय का? त्यामुळे सगळ्यांनी एक व्हा. दसरा मेळाव्यानंतर एक तारीख ठरवू आणि तुमचा मेळावा घेऊ,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र लहान भावांची

- Advertisment -

ताज्या बातम्या