Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यापक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन'; घेतला 'हा' निर्णय

पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘मास्टर प्लॅन’; घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला (Shivsena) एका मागे एक धक्के मिळत आहेत. याआधी अनेक आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे तर आता खारदारांनीही वेगळा गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे…

- Advertisement -

यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) हे आता पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे

आज सायंकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. लोकप्रतिनिधी गेले तरी संघटनात्मक पातळीवर मात्र पक्ष मजबूत ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दररोज बैठका घेत आहेत.

तसेच मुंबईच्या (Mumbai) पश्चिम उपनगरातील उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनांची आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.

दरम्यान, सध्या दिल्लीत (Delhi) थांबलेल्या खासदरांना घेऊन नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या