मुंबई | Mumbai
नुकत्याच झालेल्या पाच पैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात असून महाराष्ट्रात (Maharashtra) रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपला खुले आव्हान दिले आहे. दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. यानंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला…
MLA Prakash Solanke : “राजकीय विरोधकांनी माझ्या घरावर हल्ला केला”; आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, पाच राज्यांमध्ये निवडणुका (Election) पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले. त्यामुळे आता त्यांना माझं आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (Mumbai Nmc) निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले. तसेच सरकारला आणि अदाणींना मला विचारायचं आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत, त्याठिकाणी धारावी वासीयांना राहायला घर मिळायला हवे. त्यामुळे जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबरला धारावीहून अदाणींच्या कार्यालयावर शिवसेनेचा (Shivsena) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
Assembly Elections Results 2023 : चार पैकी भाजपची तीन तर कॉंग्रेसची एका राज्यात आघाडी
पुढे ते म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिले होते की, निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो का? कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बजरंग बलीच्या नावाने मतं मागितली. तर मध्यप्रदेशात अमित शाह यांनी मतदारांना रामलल्लांचं फुकट दर्शन घडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा (Voting) मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिले नाही, असेही ठाकरेंनी म्हटले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
NCP Crisis : “अजित पवारांची भूमिका…”; ‘त्या’ गौप्यस्फोटाबाबत शरद पवार स्पष्टच बोलले