उगाव। वार्ताहर Ugaon
सिन्नर-मालेगाव महामार्गावरील निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या शिवडी-उगाव या मध्य रेल्वेच्या रेल्वे फाटक क्रमांक 101 या रेल्वे फाटकाचे रेल्वे विभागाच्या वतीने उद्या शुक्रवार (दि.22) ते सोमवार (दि.25) नोव्हेंबरपर्यंत या रेल्वे फाटकाचे दुुरुस्तीचे कामकाज होणार असल्याने दररोज रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत हे फाटक रेल्वे विभागाच्या कामकाजासाठी बंद राहणार असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक व ये-जा बंद असणार आहे.
हे देखील वाचा – २३ नोव्हेंबरलाच सत्ता स्थापनेचा दावा करणार – संजय राऊत यांची माहिती
परिसरातील नागरिकांनी वाहनधारकांनी तसेच गुजरातहून येणार्या साईभक्तांनी पुण्यामार्गे उगाव येथे बेदाणा खरेदीसाठी येणारा व्यापारी वर्ग तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजाराचे भाजीपाला बाजार केंद्र म्हणून असलेले खानगाव नजीक येथे येणारा व्यापारी वर्ग तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले असून रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत निफाड वरून जाणार्या निफाड तालुक्यातील उत्तरपूर्व पट्ट्यातील गावच्या सर्व नागरिकांनी या मार्गाने या वेळेत येवू नये, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाच्या कुंदेवाडी रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा Maharashtra Assembly Election 2024 : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
यासाठी पिंपळगाव, गुजरातकडे तसेच उगाव, खानगाव नजीक जाण्याचा मार्ग नागरिकांनी निफाडवरून कुंदेवाडी फाटकाचा वापर करून कुंदेवाडी, नांदुर्डी, खेडे, उगाव मार्गे लासलगाव चांदवड, मालेगावकडे तसेच निफाड वरून दुसरा पर्यायी मार्ग निफाड उपजिल्हा रुग्णालय हा जिल्हा परिषद मार्ग नांदुर्डी येथून पिंपळगाव रानवड सहकारी साखर कारखाना व उगाव असे नांदुर्डी वरून प्रवाशांना जाता येईल, अशीही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा