नाशिक । प्रतिनिधी Nashik
यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठीची कार्यपद्धती (एसओपी-स्टॅन्डर्ड आपरेटींग प्रोसिजर) जाहीर केली आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी तापमान तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आदी सूचना देऊन ‘यूजीसी’ने परीक्षा होणारच असल्याचे यातून स्पष्ट केले आहे. विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत ‘यूजीसी’ने ६ जुलैला सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार प्रत्यक्ष लेखी परीक्षा किंवा ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने सप्टेंबर अखेपर्यंत परीक्षा घेण्याची मुभा विद्यापीठांना देण्यात आली. यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना परीक्षा घेण्याबाबतची कार्यपद्धती देण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.
* विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी संपूर्ण परीक्षा केंद्रातील भिंती, दरवाजे, प्रवेशद्वारे, खुर्च्या र्निजतुक कराव्यात.
* परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे. परीक्षा केंद्रातील सेवकांनी हातमोजे आणि मास्कचा वापर करावा.
* परीक्षा केंद्रावरील प्राध्यापक, सेवकांकडून त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे हमीपत्र घ्यावे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थी आणि प्राध्यापक, सेवकांच्या शरीराचे तापमान तपासावे.
* सर्व विद्यार्थी आणि सेवकांना आरोग्य सेतु अॅप बंधनकारक करावे. सुरक्षित अंतर राखण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावावेत.
* विद्यार्थी, सेवकांना परीक्षा केंद्रात सोडताना एका वेळी एकाच व्यक्तीला सोडावे. प्रवेशद्वारावर दोन मीटर अंतर राखणारे चौकोन आखावेत.
* विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत दोन विद्यार्थ्यांमधील एक आसन रिकामे ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येणारे प्रवेशपत्र, सेवकांना त्यांचे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यासाठीचा पास म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.
* जेथे रहदारी, वाहतुकीवर निर्बंध असतील, त्या भागात विद्यार्थ्यांचे आयकार्ड हेच वाहतुकीसाठी पास समजावेत.
* परीक्षेचे कामकाज हाताळणार्या कर्मचार्यांनी फ्रेश मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरावेत.
* हॉलमध्ये स्टाफरुममध्ये सॅनिटायझर बॉटल्सची व्यवस्था करावी.
* सर्व स्वच्छतागृह स्वच्छ, निर्जंतुक करावेत.