श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील उख्खलगाव (Ukhkhalgaon)परिसरात रविवार (दि. 8) रोजी दुपारी तीन वाजता ढगफुटी सदृश जोरदार पाऊस (Cloudburst Like Rain) झाला. जोरदार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने डोंगरावर जनावरांना चरायला घेऊन गेलेल्या भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर ही व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. तर अनेक घरांच्या भिंती पडल्याने तसेच जोरदार पावसामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने शेतजमिनी पिकांसह (Crops) वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. पुरामुळे विसापूर-पारनेर रस्त्यावरील (Visapur-Parner Road) पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता रात्री उशिरापर्यंत वाहतूकीसाठी बंद होता.
याबाबत अधिक नुसार तालुक्यातील विसापूर (Visapur), उख्खलगाव (Ukhkhalgaon), सुरेगाव (Suregav) परिसरात रविवारी दुपारी वादळी वार्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उख्खलगाव परिसरातील खंडोबा मंदिराच्या डोंगरावर अचानकपणे ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात होऊन डोंगराच्या उतारावरील पाणी साठवण्यासाठी केलेल्या ताली फुल होऊन वाहू लागल्या तर काही ताली फुटल्याने पाण्याचा लोंढा अचानक वाहून परिसरातील ओढ्यावर पूर (Flood) परिस्थिती निर्माण झाली. डोंगरावर चरण्यासाठी नेलेले जनावरे माघारी घेऊन जात असताना ओढ्याला अचानक आलेल्या पुरामध्ये काही जनावरे बाहेर निघाली तर काही वाहू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने कोरेकर हे पाण्यात वाहून गेले.
स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडविण्यात यश आले. अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने परिसरातील शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या, परिसरातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पावसाने तीन ते चार घरांच्या भिंती पडल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. विसापूर-पारनेर रस्त्यावरील (Visapur-Parner Road) पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता रात्री उशिरापर्यंत वाहतूकीसाठी बंद असल्याने रविवारी विसापूर येथील आठवडे बाजार असल्याने बाजारासाठी रांजणगाव मशीद, बाबूर्डी, कडूस, तालुक्यातील चांभूर्डी, सारोळा सोमवंशी व उखलगाव येथून आलेल्या नागरिकांची पुरामुळे तारांबळ उडाली.