Saturday, May 4, 2024
Homeनगरउंबरेत करोनाचे सावट; दोन महिन्यांत 30 जणांचा बळी

उंबरेत करोनाचे सावट; दोन महिन्यांत 30 जणांचा बळी

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे गावावर करोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस उंबरे परिसरातील रूग्णांची संख्या वाढत असून दोन महिन्यांत 30 जणांचा करोना महामारीने बळी घेतला आहे. उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केेंद्रात घेण्यात आलेल्या चाचणीत 1 हजार 400 पैकी उंबरेसह अन्य लगतच्या गावातील सुमारे 550 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरे येथे बाधित रुग्णांना उपचार सुरू केले आहेत. 35 रुग्णांपैकी 14 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. अनेक जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यापासून अडीच हजार महिला, पुरुष यांना लसीकरण करण्यात आले आहे. चौदाशे नागरिकांच्या चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये 450 तर बाहेर चाचणी करणारांमध्ये 100 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश जाधव, डॉ. विजय मेहेत्रे, डॉ. संयुक्ता खळदकर, एम. एन. बर्डे, पी. व्ही. साळवे, सुचित्रा ढोकणे, एम. एस. तापकीर, संजय कपूर, पी. एल. बोगा, पूजा ढवळे, जेम्स ससाणे, यु. जी. जगताप, राजू नगरे, एस. बी. गडाख, संजय ढोकणे, बाबासाहेब आवारे हे वैद्यकीय पथक सेवा देत आहे. उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उंबरे, ब्राह्मणी, वांबोरी, खडांबे खुर्द, खडांबे बु., धामोरी खुर्द, धामोरी बु., गुंजाळे, कात्रड, कुक्कडवेढे, बाभूळगाव, अंतर्गत तेरा गावे असून त्यांची लोकसंख्या 60 हजार आहे.

उंबरे येथे रुग्णांना चहा, नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था ग्रामविकास अधिकारी एम. पी. राऊत यांनी केली. यात अमोल ढोकणे, चंद्रभान ढोकणे, गणेश ढोकणे, रवी ढोकणे, आप्पासाहेब ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, योगेेश ढोकणे, भैय्या ढोकणे यांनी सहकार्य केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या