Sunday, June 23, 2024
Homeनगरउंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यास मारहाण

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यास मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यास तेथील वैद्यकीय अधिकार्‍याने नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत कोंडून ठेवत मारहाण केली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात वैद्यकीय आधिकार्‍यांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी राजेश भाऊराव नगरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव व कर्मचारी संजय कपूर यांनी मला केबिनमध्ये बोलावूनमाझा मोबाईल घेत पासवर्डची मागणी करून तोंडात मारले व माझा शर्ट फाडून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. तसेच प्रगती साळवे हिने फिर्यादी नगरे यांचा मोबाईल घेऊन तो आरोपी सुचित्रा ढोकणे हिच्याकडे देऊन मोबाईलचा फॉरमॅट मारून मला परत दिला. तसेच मला केबिनमध्ये कोंडून ठेवले.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी डॉ. अविनाश वसंतराव जाधव, संजय सुरज कपूर, प्रगती साळवे, सुचित्रा ढोकणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे ता.राहुरी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं. 153/2023 भारतीय दंड विधान कलम 341, 323, 427, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डी. आर. चव्हाण हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या