Tuesday, May 28, 2024
Homeनगरउंबरेत उसाला शॉर्टसर्किटमुळे आग

उंबरेत उसाला शॉर्टसर्किटमुळे आग

उंबरे |वार्ताहर| umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील अजित नामदेव ढोकणे यांच्या गटनंबर 215 मधील पाच एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. या जळितामुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दुपारच्या सुमारास उसाच्या शेतीतून जाणार्‍या वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने त्यातून जोराच्या ठिणग्या पडू लागल्या. त्यामुळे ताराखाली असलेल्या उसाच्या पिकाने पेट घेतला. आगीच्या ज्वाला पाहून आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. आगीमुळे लगतच्या क्षेत्रालाही त्याची झळ बसली असती. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून शेतकर्‍याला तातडीने मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या