Sunday, May 26, 2024
Homeनगर‘उमेद’चे खासगीकरण करू नका

‘उमेद’चे खासगीकरण करू नका

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

नेवासा तालुक्यात सध्या 700 च्या पुढे उमेद संस्थेचे बचत गट झालेले आहेत. ‘उमेद’ संस्थेमुळे महिलांचे सक्षमीकरण झाले आहे.

- Advertisement -

या चळवळीमध्ये माजी सभापती सुनीताताई गडाख यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या संस्थेचे खासगीकरण करू नये,अशी मागणी सुरेशनगरच्या माजी सरपंच अनिता उभेदळ यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे.

ना. गडाख व मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला दिशा देण्यासाठी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) बाह्य संस्थेकडे वर्ग करणार असल्याचे म्हटले जाते. यामुळे पुन्हा सावकारशाही येऊ शकते.

आमच्या सुरेशनगर गावात एकूण 9 महिला बचत गट असून, महिला नियमित कर्ज घेतात व परतफेड करतात.त्यामुळे महिला सक्षमीकरण झाले आहे. त्यामुळे खासगीकरण करू नये,असेही अनिताताई उभेदळ यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या