Saturday, May 18, 2024
Homeनगरउंदीरगाव-माळेवाडी-सराला बेट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी

उंदीरगाव-माळेवाडी-सराला बेट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव-माळेवाडी-सराला बेट या रस्त्याचे रुंदीकरण- मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीने करण्यात येत असून रुंदीकरण व भराव कामांमध्ये भरावासाठी वापरली जाणारी खडी माती मिश्रित आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच जयश्री औताडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

सराला बेटाला जोडण्यासाठी शासनाच्या तरतुदीतून मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी निधी मिळवून दिला. उंदीरगाव-माळेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले असून उंदिरगावापासून माळेवाडीपर्यंत रस्ता करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण व भरावाचे काम सुरू आहे. सदर भरावासाठी वापरली जाणारी खडी निकृष्ट दर्जाची असून त्याच खडीवर माती मिश्रित मुरुम टाकला जात आहे. मुरुमाचे खोलीकरण दीड फुटापर्यंत करून त्याच मातीचा वापर साईडपट्टया करण्यासाठी वापरला जात आहे.

जीएसबीचा लेयर सिमेंट मिश्रीत असतांना देखील तसा न करता तो फक्त बारीक खडी टाकून रोलिंग केली जात असल्याने हे काम ठेकेदारी पध्दतीने निकृष्ट दर्जाचे आहे. या कामाची वरीष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर रस्त्याच्या काम करतांना माळेवाडी गावाचा पाणीपुरवठा योजनेच्या लाईन देखील तोडल्या असून केबल कनेक्शन देखील तोडले आहे. असून संबधितानी भरपाई देण्याची मागणीचा ठराव सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना पाठविण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच जयश्री औताडे, उपसरपंच निशा तारडे, माजी सरपंच सोपान औताडे, निलेश जाधव, अनिल वमने आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या