Monday, July 22, 2024
Homeनगरलॉकडाऊनमध्ये चिंचेमुळे अनेकांच्या आयुष्यात गोडवा!

लॉकडाऊनमध्ये चिंचेमुळे अनेकांच्या आयुष्यात गोडवा!

इंदुरी l वार्ताहर

- Advertisement -

लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबियांना आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला. मात्र चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे.

रूंभोडी( ता.अकोले) येथील सलीम वजीरभाई शेख या तरुणाचा चिंचेचा व्यवसाय आहे. थेट झाडावरून चिंच आणून फोडण्यासाठी दिले जातात. चिंच फोडून टरफल, शिरा, चिंचोका व फोडलेली चिंच वेगळी करून पुन्हा वजन करून द्यायचे या कामामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

यंदा लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे बेरोजगार झाले. त्यातील अनेकांनी सलीम शेख यांच्याशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केल्यानंतर संबंधित तरुणाने चिंचा थेट घरपोच दिल्या व फोडलेल्या चिंच, चिंचोके साधारण २५ ते ३० रुपये किलोने जागेवरच पैसे देऊन विकत घेतल्याने जवळपास चारशे कुटुंबातील सातशे जणांना घरबसल्या रोजगार चालू झाला आहे. गरीब कुटुंबियांना उत्पन्नाचे साधन सुरू झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटला आहे. अकोले, धुमाळवाडी, शाहूनगर, इस्लामपेठ, नवलेवाडी, रुंभोडी, भोरगडा या परिसरातील अनेक बेरोजगार कुटुंबियांच्या आयुष्यात चिंचेमुळे गोडवा निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या