Wednesday, May 22, 2024
Homeधुळेविजेचा शॉक लागून सुनेसह सासुचा दुर्दैवी मृत्यू

विजेचा शॉक लागून सुनेसह सासुचा दुर्दैवी मृत्यू

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील बजरंग सोसायटीत काल रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरातील तारेवर ओले कपडे टाकत असतांना तारेत विद्युत प्रवाह असल्याने विजेचा शॉक (Electric shock) लागून सुनेसह सासूचा मृत्यू झाला. याबाबत धुळे तालुका पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

शोभाबाई कृष्णा झीने (वय 39) व रुखमाबाई पांडुरंग झीने (वय 65 रा.प्लॉट नं.54, बजरंग सोसायटी, महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे) अशी मयत सुन व सासुचे नाव आहे. शोभाबाई ही काल दि.19 रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरातील ओले कपडे तारेवर टाकत होती. पंरतू तारेत विद्युत प्रवाह असल्याने शोभाबाई हिस विजेचा धक्का लागला.

तेव्हा तिची सासू रुखमाबाई ही तेथेच जमिनीवर बसलेली असतांना शोभाबाई ही तारेसह रुखमाबाई यांच्या अंगावर पडली. त्यामुळे रुखमाबाई यांनाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांना धाव घेत घरातील विज प्रवाह (Lightning current) बंद करुन दोघींना बाजुला केले.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, उपनिरीक्षक राजश्री पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होत. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या