Friday, April 25, 2025
Homeनाशिकअज्ञात समाजकंटकांकडून मोटारसायकलींची जाळपोळ ; इगतपुरी तालुक्यातील घटना

अज्ञात समाजकंटकांकडून मोटारसायकलींची जाळपोळ ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे गुरुवार दिनांक २० रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून ४ मोटारसायकली जाळल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. माणिकखांब गावातील दाट लोकवस्तीमधील घरांच्या समोर उभ्या असणाऱ्या ह्या मोटारसायकली जाळल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेत सुरेश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, अनिल भटाटे, राजू भटाटे यांच्या मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत. या चार पैकी ३ मोटारसायकली भस्मसात झाल्या आहेत तर एक मोटारसायकल कमी प्रमाणात जळाली आहे. प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे माणिकखांब गावात संताप व्यक्त केला जात असून अज्ञात समाजकंटकांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...