Saturday, May 25, 2024
Homeनाशिकमराठा आरक्षणासाठी 'या' तारखेपर्यंत अखंडित साखळी उपोषण

मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत अखंडित साखळी उपोषण

नाशिक | प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंंबर पर्यंत अखंडित साखळी उपोषण करण्याचा निर्णय सकल मराठा समाज नाशिक जिल्हा कोअर कमिटीची बैठकीत घेण्यात आला. नाशिकच्या शिवतीर्थावर उपोषण स्थळी झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला दिलेल्या सूचना तंतोतंत पाळणे,तसेच शिवतीर्थावर सुरू असलेले मराठा साखळी उपोषण निरंतर ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. जिल्हाभर मराठा समाजाला टप्प्या टप्प्याने भेटून आरक्षण लढ्यात आरक्षण मिळेपर्यंत जागते ठेवले जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी शांततेचा लढा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी एकमुखी घेण्यात आला.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या माध्यमातून गेल्या ५५ दिवसापासून अखंडित साखळी उपोषण नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर सुरु आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मराठा योद्धा नाना बच्छाव यांनी केले,नाना बच्छाव यांनी ६ दिवस अन्नत्याग उपोषण ही केले, ते नुकतेच सुटले आता नाशिकच्या साखळी उपोषणात रोज मराठा बांधवांचे विविध मंडळे,व्यक्ती,संस्था यांनी वार नुसार जबाबदारी देण्यात आली, अजूनही यात अनेक व्यक्ती, मंडळे सहभागी होऊन हे साखळी उपोषण सक्रिय ठेवले जाणार आहे.

त्याकामी रविवारी वकील संघ, सोमवारी एमटीव्ही मराठा ग्रुप, नाशिक, मंगळवारी सुमनताई, वंदनाताई पाटील, अश्विनीताई ओम साई महिला संघ, नाशिक, बुधवारी स्वाती कदम व टीम, गुरुवारी सकल मराठा समाज जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर व सहकारी,शुक्रवारी रोहिणी ताई उखाडे व सहकारी महिला वर्ग,शनिवारी मंगलताई शिंदे,रोहिनीताई दळवी व टीम यात वारानुसार सक्रिय राहील,दरम्यान एसटी निवृत्त कामगार मंडळ, उत्कर्ष मित्र मंडळ, डॉक्टर टीम, केमिस्ट असोसिएशन हे बैठक घेऊन शक्य होईल त्या दिवशी साखळी उपोषणात सक्रिय होतील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या वेळी जिल्हाभर गाव खेड्यात,शेतवस्तीवर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने जनजागृती करून मराठ्यांचा उंबराया विषयावर व्हिडीओ तयार करुन मराठा समाजाचे मागासलेपणा व त्याची हलत ही सरकार व समाजापर्यंत नेण्याचे काम अखंडित राहील, त्याकामी टीम म्हणून सकल मराठा समाजाचे प्रचारक शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील, प्रवक्ते राम खुर्दळ, ज्ञानेश्वर सुरासे, रिंकू उखाडे, सचिन निमसे ही टीम कार्यरत राहील,गाव खेड्यातील,शहरातील वस्तीत मराठा समाजाला मराठा आरक्षणाची शपथ दिली जाईल असे ही नियोजन यावेळी राम खुर्दळ यांनी सांगितले.

यावेळी मराठा बांधवानी अनेक संकल्पना मांडल्या त्यात ज्या मराठा बांधवाला सकल मराठा समाज मराठा साखळी उपोषण माध्यमातून काही कार्य करायचे त्यांनी शिवतीर्थावर कोअर कमिटीसोबत संवाद करावा व त्यानंतर ते उपक्रम घ्यावे असे ही यावेळी सूचना मांडण्यात आल्या.

यावेळी सकल मराठा समाजाचे चंद्रकांत बनकर,नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील,नितीन डांगे पाटील,अॅड.कैलास खांडबहाले,यांनी फोनवरून संवाद साधला. तर बैठकीत राम खुर्दळ,शरद लभडे पाटील,विकी गायधनी,अनिल हांडगे,योगेश कापसे,निलेश ठुबे, राजेंद्र शेळके,जगदीश भोसले,अनिल आहेर.

तसेच, वंदना भोसले, मंगला शिंदे, रोहिणी दळवी, राम गहिरे, सागर वाबळे, नितीन खैरनार, हेमंत देवरे, राजेंद्र शेळके, अरुण मोरे, ज्ञानेश्वर कवडे, नितीन काळे, सुधीर पोळ, रोहिणी उखाडे, सुभाष शेळके, सुधाकर चांदवडे, संजय पांगारे, प्रकाश आहेर, अण्णा पिंपळे, पूजा धुमाळ, श्रीराम निकम, अविनाश वाळुंजे, तनिष्का बंडवर, विराज पठारे, हेमंत बडवर, सुनील निरगुडे, भाऊ शेलार उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या