Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2021 : अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्याला काय मिळालं?

Union Budget 2021 : अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्याला काय मिळालं?

दिल्ली l Delhi

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प २०२१-२२ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत सादर केला. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. यावेळी शेतमालाल दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

- Advertisement -

बजेटमध्ये शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सरकराने केला आहे. बजेट सादर करताना सीतारामन यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी ४०००० कोटींची तरतूद केली आहे. किमान आधारभूत किमतीचा फायदा देशातील १ कोटी ५४ लाख शेतकऱ्यांना झाला असल्याचा दावा सीतारामन यांनी बजेटमध्ये केला. त्या म्हणालया की धान आणि गव्हाची किमान आधारभूत किंमत वाढण्यात आली होती.

गहू खरेदी करताना सरकारने शेतकऱ्यांना ७५०६० कोटी देण्यात आले. तर धानासाठी १.७२ लाख कोटी देण्यात आले. जे आर्थिक वर्ष २०२० च्या तुलनेत जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. डाळींच्या खरेदीसाठी सरकारने शेतकऱ्यांना १०५३० कोटी देण्यात आले. त्याशिवाय कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा वाढवण्यात येणार आहे.

त्याशिवाय सिंचनासाठी सरकारने बजेटमध्ये १०००० कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सिंचनासाठी आर्थिक मदत मिळणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्याशिवाय मत्स व्यवसायाला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी पाच मोठ्या बंदरांचा विकास केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या