Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याBudget 2024 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा; आता 'इतक्या' लाखांपर्यंत एक रुपयाही...

Budget 2024 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मंगळवारी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी विविध क्षेत्रासाठी तरतूद केली असून रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.तसेच या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी

यात जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामण यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे १७५०० रुपये वाचणार आहेत. याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारावरुन ७५ हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा १५ हजारावरुन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी तिजोरी उघडली! सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय?

दरम्यान, नव्या करप्रणालीत ० ते ३ लाख रुपयांपर्यंत कुठलाही कर आकारला जाणार नाही. तर ३ ते ७ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के, ७ ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांकडून ३० टक्के कर आकारला जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...