Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रUnion Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा,...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन

नवी दिल्ली | New Delhi

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी एनडीए सरकारचा (NDA Government) पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी बळ देणाऱ्या बिहार आणि आंध्रप्रदेशवर खजिना लुटवला गेला आहे. इतकंच नाही तर हिमाचल प्रदेशसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, निवडणूक होऊ घातलेले राज्य असलेल्या महाराष्ट्रासाठी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

हे देखील वाचा : अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी

यावरुन संतप्त झालेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीच्या खासदारांनी (MVA MP) आंदोलन करत मोदी सरकारविरोधात (Modi Government) जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्र आणि मुंबईच्या तोंडाला पान पुसण्याचे काम सरकारने केले, येणाऱ्या काळात जनता विधानसभेच्या निवडणुकीत यांना धडा शिकवेल, असा इशारा यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंत एक रुपयाही कर नाही

तर नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) म्हणाले की, अर्थसंकल्प पाहिला तर महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, असे म्हणायला वाव आहे. शेतकऱ्यांना देखील या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. आंध्रप्रदेश आणि बिहार या राज्यांना जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आधी होता, त्यामुळे त्यांना काहीच दिले नाही असे वाटते. ज्यांच्यामुळे सरकार आहे, त्यांना जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होत्या. याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशारा यावेळी वाजे यांनी मोदी सरकारला दिला आहे.

हे देखील वाचा : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? ठेंगा… वडेट्टीवारांची अर्थसंकल्पावर कडाडून टीका

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर मोदी सरकार सत्तेत आणण्यासाठी जेडीयू नितीश कुमार आणि टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरुन पैसा दिल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...