Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशUnion Budget 2025 : मोदी सरकारची अर्थसंकल्पातील मोठी घोषणा; १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर...

Union Budget 2025 : मोदी सरकारची अर्थसंकल्पातील मोठी घोषणा; १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज शनिवार (दि.०१ फेब्रुवारी) रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिला आणि करदात्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

- Advertisement -

यात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठल्याही प्रकारे कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. तसेच नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार असून मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणे हे नव्या विधेयकाचे उद्दिष्ट असणार आहे.तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा १ लाखांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय आयकर भरण्याची मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवली आहे.

दरम्यान,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. नोकरदारवर्गाला मोठी भेट देतानाच अर्थमंत्री सीतारामन यांनी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे.

अशी आहे नवी कररचना

० ते ४ लाख – शून्य

४ ते ८ लाख – ५ टक्के

८ ते १२ लाख – १० टक्के

१२ ते १६ लाख – १५ टक्के

१६ ते २० लाख – २० टक्के

२० ते २४ लाख – २५ टक्के

२४ लाखांवर – ३० टक्के

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...