टीम देशदूत : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तेजस एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्या पर्यटनस्थळांना जोडल्या जाणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत
रेल्वे स्टेशन डेव्हलेपमेंट मोदी सरकार करणार आहे. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मार्गाचे काम वर्ष 2023 पर्यंत पूर्ण करण्यासोबत 2000 किमीचे किनारी रस्ते तयार केले जाणार आहेत.
550 रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. रस्ते विकासावर मोदी सरकारची भर असणार आहे. यामध्ये तेजस एक्सप्रेस सारख्या गाड्यांची वाढ करणार, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील जलद गाड्या वाढवण्यात येणार आहेत.
तर पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद बजेट मध्ये करण्यात आली आहे.पीपीपी मॉडेलवर रेल्वे चालवल्या जाणार असून रेल्वेच्या खासगीकरणाची चाचणी केली जाणार आहे.