Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार

नवी दिल्ली / New Delhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (7 जुलै) होणार आहे. देशातील भाजपच्या (BJP) सर्व खासदारांना (Members of Parliament) दिल्लीत हजर होण्याचे आदेश भाजपने दिले आहेत.

- Advertisement -

कोविशिल्ड लस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडी नाहीत?

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (bjp president j.p.nadda) हे हिमाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. ते आज सायंकाळी नवी दिल्लीत परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या मंत्र्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, त्यांना दिल्लीत येण्यासाठी फोन करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे (MP Narayan Rane ) दिल्ली पोहोचले आहेत. राज्यातील इतर अनेक नावांची चर्चा आहे. कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत.

राज्यात लवकरच ‘शिवसेना-भाजपा’चे सरकार?

- Advertisment -

ताज्या बातम्या