Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन

लालबागच्या राजाचे घेणार दर्शन

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान या दौऱ्यात अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायांचं दर्शन घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षी ‘लालबागचा राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईमध्ये सहकुटुंब येतात, त्याच प्रकारे यंदाही त्यांचा दौरा असला, तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यात सध्या बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि मालवण, राजकोट इथं कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. अशात होत असलेला अमित शाह यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

ताज्या बातम्या

आसाममध्ये

Assam Legislative Election 2026: भाजपची विजयी हॅट्रिककडे वाटचाल; आसाममध्ये मामा-मियाची जादू

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiआसाम विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालात आतापर्यंत भाजपा मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागांपैकी 99...