Friday, November 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृह मंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर

स्व.अजित पवार यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय शहा हे पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता अमित शहा भारत फोर्ज लिमिटेडच्या मुंढवा कॅम्पसला भेट देणार आहेत. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील मुंबई-पुणे महामार्गावरील एनएचईसी प्रकल्पात आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात एनएचईसी मल्टिस्टेट सहकारी संस्थेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार असून, यावेळी महाराष्ट्रासाठी भारत टॅक्सी सेवेचा औपचारिक शुभारंभही शहा यांच्या हस्ते होईल.

दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी अमित शहा सेनापती बापट मार्गावरील भारतीय जैन संघटना मुख्यालय आणि शांतिलाल मुथा फाउंडेशन मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण भवन येथील दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात ‘मराठा इतिहास-डिजिटल अभिलेखागार’ या उपक्रमाचे लोकार्पण शहा करणार आहेत.

ताज्या बातम्या

Nashik : दीड कोटी रुपयांची रोकड जप्त

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिकरोड रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अमृत भारत एक्स्प्रेसमधून एका तरुणांकडून तब्बल १ कोटी ४८ लाख...