Tuesday, March 25, 2025
HomeनगरAmit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन (Shaneshwar Darshan) घेवून पूजा केली. दुपारी दोन वाजता घोडेगाव (Ghodegav) येथील हेलीपॅडवर आगमन झाले. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते शनिदेवाच्या मूर्तीस तेल अर्पण करत उदासी महाराज मठात अभिषेकही या वेळी करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil), आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शहा यांना संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला. पाटील, प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा, अॅड.सयाराम बानकर, यांच्याशी शहा यांनी हस्तांदोलन करत देवस्थानचे उत्पन्न तसेच सुख सुविधा या बाबतीत विचार पुस केली. 

अंकुश काळे, मनोज पारखे, ऋषिकेश शेटे, प्रताप चिंधे, माऊली पेचे, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब कर्डक आदी उपस्थित होते. शनिशिंगणापूर (Shanishinganapur) देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तत्पूर्वी श्री. शाह यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...