नाशिक | प्रतिनिधी Nashik
आगामी विधानसभा निवडणुकीत सध्या ताब्यात असलेल्या जागांसह अजुन किमान सात – आठ जागा तरी वाढीव मिळाव्या यासाठी भाजपाने कंबर कसली असुन विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नियोजनाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हाती घेतली आहेत. शाह राज्याच्या दौर्यावर आले असून उद्या २५ सप्टेंबर २०२४, बुधवारी ते नाशिक मध्ये पाच जिल्ह्यांतील तयारीचा आढावा घेणार आहेत.
भाजपने लोकसभा निवडणूक विधानसभा केंद्रबिंदू ठेवून लढविली होती. आता विधानसभा निवडणूक मात्र सुक्ष्म नियोजनाद्वारे मंडळ स्तरावर लढविली जाणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण तयारी झाली आहे. विभागातील विधानसभा संयोजक, प्रभारी, मंडळ अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा घेऊन केंद्रीय गृहमंत्री शाह मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी केंद्रीय वन मंत्री भुुपेंद्र यादव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपस्थीत राहणार आाहेत.
बुधवारी ( ता.25) दुपारी बाराला शाह यांचे नाशिकला आगमन होईल. दीड ते चार च्या दरम्यान ते सातुपर येथील हॉॅटेेेल डेमोक्रॉसी येंथे बैठकीत मार्गदर्शन करणार आहे. पावणे पाचला कोल्हापूरला रवाना होतील.
बैठकीत साधारण 750 पदाधिकारी उपस्थीत असतील. ही बैठक यशस्वीतेसाठी आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, आ.डॉ.राहुल आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी,विजय साने, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचीटणीस सुनील केदार, नाना शिलेदार पवन भगुरकर आदींसह पदाधीकारी प्रयत्नशील आहेत.