Friday, April 25, 2025
Homeनाशिककेंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या शुक्रवार २४ जानेवारी २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहे. मंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराज मंदिरात दर्शन घेणार असून १२.३० ते १२.५५ ही वेळ त्यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्र्यंबकेश्वर दौर्‍यानिमित्त तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडवर हेलिकॉप्टर उरवण्याचा सराव आज करण्यात आला. त्यामुळे परिसरात हा उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय झाला होता.

या निमित्ताने उद्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक जिल्ह्यात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजीचे रात्री 00.00 ते दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी 00.00 या कालावधीत ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...