Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकजलशक्ती अभियानांतर्गत जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे - खाडे

जलशक्ती अभियानांतर्गत जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे – खाडे

जलशक्ती अभियान २०२४ चा घेतला आढावा

नाशिक | Nashik

- Advertisement -

जलशक्ती अभियानांतर्गत (Jal Shakti Abhiyan) जलस्त्रोतांचे बळकटीकरण करतानाच या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे. या अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा (Nashik District) जलयुक्त करावा, असे निर्देश जलशक्ती अभियानाचे केंद्रीय नोडल अधिकारी तथा सहसचिव नितीन खाडे (Nitin Khade) यांनी दिले.

हे देखील वाचा : मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कृषीमंत्र्यांचा निर्णय

केंद्र सरकार पुरस्कृत जलशक्ती अभियान २०२४ मोहीम अंतर्गत केंद्रीय समितीची आढावा बैठक आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव हरिभाऊ गीते, जिल्हा जलसंधारण अधिकारी अ. वि. कापडणीस, अभियानाचे वैज्ञानिक निर्मलकुमार नंदा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

हे देखील वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

यावेळी केंद्रीय सहसचिव खाडे म्हणाले की, पाण्याची बचत सर्वात महत्वाची आहे. पाणीपुरवठा योजना तयार करतानाच शाश्वत जलस्त्रोत शोधावेत. जेणेकरून आगामी काळात पाण्याची टंचाई जाणवणार नाही. तसेच पाणी योजना दीर्घकालिन होण्यासाठी या योजनांच्या व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढवावा. पावसामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधबंदिस्तीसाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठीही व्यापक स्तरावर अभियान राबवावे, अशाही सूचना सहसचिव श्री. खाडे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो”; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

तर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी सांगितले की, जलशक्ती अभियानाची नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गाव पातळीपासून ते तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून विविध कामे केली जात आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वैज्ञानिक नंदा यांनी मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता गीते यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या