यावल Yaval ( प्रतिनिधी )
येथील तालुक्यातील गुजरात (Gujarat) आणि मध्यप्रदेश (Madhya Pradesh) या दोन प्रमुख राज्यांना जोडणार्या अंकलेश्वर- बर्हाणपूर (Ankleshwar- Barhanpur) या राष्ट्रीय महामार्गाच्या (national highways) नूतनीकरणास (renovation) केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, रस्ते, महामार्ग विकास मंत्री ना. नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सकारात्मकता (positive) दर्शविली आहे. भाजपा (bjp) कार्यकर्ते डॉ. सुनिल पाटील (Dr. Sunil Patil) यांनी ना. गडकरी यांना याबाबतचे निवेदन दिले होते. त्यास त्यांन अनुकूलता दर्शविली आहे.
येथील तालुक्यातील गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांना जोडला जाणाऱ्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या राज्य मार्ग चारला NH 753 B नामकरण करून राष्ट्रीय महामार्ग (National Highways) म्हणून दर्जा गेल्यावर्षी केंद्रीय रस्ते , परिवहन व महामार्ग विकास मंत्रालयाने दिला आहे तथापि सदरील महामार्गातील तळोदा – शहादा- शिरपूर- चोपडा -यावल – रावेर या जवळपास २४० कि. मी.रस्त्याची (road) अत्यंत दयनीय अवस्था (Miserable condition) झाली आहे.
मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे व अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना (vehicle owners) खूप त्रास सहन करावा लागत असून वाहन धारकांना प्रवास करतांना नेहमीच जीव मुठीत धरून व डोळ्यात तेल घालून तारेवरची कसरत करावी लागते. गुजरात राज्याचे वाढते औदयोगिकरण , उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) कृषी उत्पादनाची वाहतूक , रस्त्यालगत असलेल्या तिन राज्यातील मोठया बाजारपेठांची शहरे व गावे यामुळें हा रस्ता खूपच महत्वाचा आणी रहदारीचा व अवजड वाहनांचा मार्ग आहे.
बऱ्याचवेळेस रस्ताच्या दुर्दशेमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात (Accident) होवून आतापर्यंत हजारोंच्या संख्येने निरपराध नागरीकांची जीवितहानी सुध्दा झालेली आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी व नागरिकांमध्ये नेहमीच संताप व्यक्त होतो. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (Public Works Department) थोड्याफार प्रमाणात अत्यल्प निधीनुसार १५ ते २० कि. मी.अंतराचे टप्पे टप्पे रस्ता दुरुस्ती केली जाते. पण ती दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी टिकेल अश्या स्वरूपाची त्यांची गुणवत्ता नसून कामचलाऊ व तात्पुरती असते.
केंद्रीयमंत्री ना . नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी विकासाभिमुख, दूरदृष्टीकोणातुन आणी धाडसी व कल्पक नेतृत्वाखाली भारतात अनेक रस्ते , महामार्ग अगदी पाश्चिमात्य देशांनाही लाजवेल अश्या स्वरूपात तयार होत आहेत. महाराष्ट्रातही समृद्धी महामार्ग , पालखी मार्ग , सागरी वाहतूक अश्या प्रकारे अनेक रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे .
पण अंकलेश्वर बुऱ्हाणपुर (Ankleshwar-Barhanpur highway) याच मार्गासाठी अजून पर्यंत काहीही प्रगती होतांना दिसत नाही . भौगोलिक दृष्ट्या चौपदरीकरण शक्य नसेल तर रुंदीकरण, दर्जोन्नतीकरण , व संपूर्णपणे नूतनीकरण (renovation) (दोन पदरीकरण का असेना) या मार्गाचे काम करण्यात यावे अशी मागणी करीत आपले निवेदन डॉ. पाटील यांनी नितीन गडकरी (केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन,रस्ते, महामार्ग विकास ,भारत सरकार) यांना जामनेर येथे आ.गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्या सुकन्या यांच्या विवाह निमित्ताने आले असतांना प्रत्यक्ष भेट घेऊन साकळी तालुका यावल येथील भाजपा कार्यकर्ते डॉ सुनिल पाटील (Dr. Sunil Patil) यांनी दिले.
मंत्री महोदय यांनी सकारात्मक (positive) प्रतिसाद देत हा प्रकल्प शासनाच्या विचाराधीन असून DPR झालेला आहे, काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर कामकाज निश्चित पूर्ण होईल, असे आश्वासन ना . नितिन गडकरी यांनी दिले आहे .