Saturday, November 16, 2024
Homeमुख्य बातम्यानितीन गडकरींना करोना संक्रमण

नितीन गडकरींना करोना संक्रमण

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाचे संक्रमण झाले आहे. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

आपल्याला मंगळवारी रात्री थकवा जावणल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने करोना तपासणी केली. अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घेतले आहे.

- Advertisement -

भारतात करोना बाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 50 लाखांवर बाधित असलेला भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 1290 मृत्यू झाले आहेत.

सध्या देशात 50 लाख 20 हजार 359 बाधित आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या