Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष करा - आठवले

शरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष करा – आठवले

मुंबई | Mumbai –

काँग्रेसला अद्याप अध्यक्ष सापडत नसल्याने या पक्षाने मूळ काँग्रेसी असलेले ज्येष्ठ नेते

- Advertisement -

शरद पवार यांना अध्यक्ष करावे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, काँग्रेस आणि शरद पवार यांनी मिळून निर्णय घ्यावा, असे आठवले म्हणाले.

काँग्रेस हा देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र, सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष 100 खासदारही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपविल्यास लाभ होईल, असेही आठवले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या