Friday, November 8, 2024
Homeनाशिककेंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची लंडनच्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटला येथे...

केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची लंडनच्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटला येथे भेट

मुंबई | Mumbai
पर्यटन विभाग, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयासोबत सह-प्रदर्शक वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट हे आहेत. शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच आपली वैविध्यपूर्ण पर्यटन क्षमता, नैसर्गिक सौंदर्य आणि वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रीगजेंद्र सिंह शेखावत आणि मुग्धा सिन्हा पर्यटन महासंचालक यांनी भेट दिली. केंद्रीय मंत्र्यांना दोन्ही केंद्रशासित प्रदेशांची कॉफी टेबल बुक्स सादर करण्यात आली. भेटीदरम्यान त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांद्वारे जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक आकर्षणांच्या समृद्ध मिश्रणासह एक अद्वितीय गंतव्यस्थान म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा त्यांनी केली.

- Advertisement -

शेखावत यांनी सध्या युनायटेड किंगडममध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि नागरिकांनीही भेट घेतली. पर्यटन उद्योगात सक्रियपणे योगदान देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले आणि जागतिक स्तरावर भारताचे आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन क्षमतेचे प्रतिनिधित्व करण्याच्या त्यांच्या भूमिकेच्या महत्त्वावर भर दिला. विद्यार्थ्यांशी त्यांच्या संवादातून तरुण नागरिकांना सशक्त बनवण्याची आणि त्यांचा वारसा, संस्कृती आणि समाजाच्या विकासाशी त्यांचा संबंध वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या