Saturday, April 26, 2025
Homeराजकीयशहरातील खड्ड्यांबाबत शिवसेनेतर्फे अनोखे आंदोलन

शहरातील खड्ड्यांबाबत शिवसेनेतर्फे अनोखे आंदोलन

जळगाव – Jalgaon

शहर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये शहर शिवसेनेतर्फे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये कमळाची फुले लावून शहर सुंदर करण्याचे काम शिवसेनेतर्फे करुन महापालिकेचा कारभाराचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -

शहर मनपाने गेल्या काही वर्षापासून शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या खड्ड्यांची पाहणी करुन लवकरात लवकर शहरातील रस्त्याची डागडुजी किंवा नवीन रस्ते तयार करुन शहर वासीयांना चांगले रस्ते तयार करुन शहरवासीयांचे हाल थांबवावेत, अन्यथा शहर शिवसेनेच्या वतीने येणार्‍या काळात महापालिका आयुक्तांना खडी, डांबर व कछ देवून त्यांचा सत्कार करण्यात येईल.

रस्त्यांचा प्रश्‍न ही शहरातील मोठी समस्या झाली असून गेल्या काही महिन्यांपूर्वी मेन रस्ते हे डब्ल्यूबीएमने करण्याचे आदेश उपमहापौरांनी दिले होते. याबाबत रस्त्याच्या ०.४५ ऐवजी त्याची उंची वाढवा असेही ठरले होते. त्यावेळी शहरातील रस्त्यांची कामे कसे तरी उरकवण्यात आले होते. सध्या पावसाळा सुरू आहे. दोनतीन पाणी जोरात पडले की खड्ड्यांची अजूनही दयनीय अवस्था होणार हे लक्षात घेता लवकरच हे रस्ते दुरूस्त करा, खड्डे बुजवा, पक्के रस्ते करण्यात यावेत असेही शिवसेना पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

निषेध करतांना शिवसेनेचे पदाधिकारी व साई फौंडेशनचे संस्थापक अध्य निलेश पाटील, गजानन मालपुरे, संजय कोल्हे, जितेंद्र बारी, सोहम विसपुते, नितीन राजपुत, विजय राठोड, लोकेश पाटील, मंगला बारी, ईश्‍वर नाईक, महेंद्र सोनवणे, विलास भदाणे, ज्ञानेश्‍वर सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, विमल मेहता, भारत कोचुरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या