Sunday, November 24, 2024
Homeक्रीडामहेंद्रसिंग धोनीसोबत अनोखा योगायोग

महेंद्रसिंग धोनीसोबत अनोखा योगायोग

नवी दिल्ली – New Delhi

आपल्या कर्णधारीच्या नेतृत्वाखाली भारताला दोन वेळा विश्व कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवारी खूप साधारण अंदाजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

धोनी बरोबर एक अजीब घटना राहिली असून तो आपल्या करीअरमधील पहिल्या सामन्यात धावचित झाला होता आणि शेवटच्या सामन्याही तो धावचित बाद झाला. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशातील चटगांवमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट करीअरची सुरुवात केली होती आणि आपल्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता. या सामन्यात भारताने ११ धावाने विजय मिळविला होता.

योगायोग म्हणजे धोनी आपल्या करीअरमधील शेवटच्या सामन्यातही धावबाद झाला होता. विश्व कप २०१९ मध्ये न्यूझिलँड विरुध्दच्या उपात्य सामन्यात धोनी धावबाद झाला. त्याला मार्टिन गप्टिलने माघारी फेकलेल्या चेंडूने धावाबाद केले यामुळे भारताच्या विश्व कप जिंकण्याच्या इच्छेवर पाणी फिरले गेले आणि भारत हा सामना हरला.

विश्व कपमधील धोनीचा हा सामना त्यांच्या करीअरमधील अंतिम सामना राहिला होता यानंतर एक वर्षानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे.

ज्युनिअर क्रिकेट ते बिहार क्रिकेट संघ, झारखंड क्रिकेट संघ ते भारतीय ए संघापर्यंत आणि तेथून सिनियर भारतीय संघा पर्यंत धोनीचा प्रवास फक्त पाच सहा वर्षात पूर्ण झाला होता.

धोनीने यामध्ये २००७ मध्ये टि-20 विश्व कप, २०११ मध्ये एक दिवशीय सामन्यांचा विश्व कप आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफी जिंकून दिली आहे. याच बरोबर २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीतेमध्ये भारताला क्रमांक एकचा संघ बनविला होता. त्याने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.

धोनीने वर्ष २०१७ च्या सुरुवातीला एकदिवशीय आणि टि-20 कर्णधारीमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती आणि आता तीन वर्षानंतर आपल्या पूर्वीच्या अंदाजामध्ये त्यांने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली.

डिसेंबर २००५ मध्ये चेन्नईमध्ये श्रीलंकेच्या विरुध्द कसोटी करीअरची सुरुवात करणार्‍या धानीने भारतासाठी ९० कसोटी सामन्यात १४४ डावामध्ये ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यांच्या नावावर सहा शतके आणि ३३ अर्धशतके आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. तर ३५० एक दिवशीय सामन्यात २९७ डावात त्यांने ५०.५७ च्या सरासरीने १०,७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या नावावर १० शतके आणि ७३ अर्धशतके आहेत. एक दिवशीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १८३ आहे.

जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ सामना समाप्ती करणारा म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनीने ९८ टि-20 सामन्यात ३८.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत. यातध्ये त्यांचे दोन अर्धशतके आहेत आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या ५६ आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या