Sunday, September 8, 2024
Homeक्राईमNashik Crime News : गुंडाला जंगी मिरवणूक भाेवली; युनिट एकने केली दाेघांना...

Nashik Crime News : गुंडाला जंगी मिरवणूक भाेवली; युनिट एकने केली दाेघांना अटक

एक्सयुव्ही कारही हस्तगत 

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मध्यवर्ती कारागृहातून सुटका हाेताच जंगी मिरवणूक (Procession) काढून शरणपूर भागात (Sharnapur Area) दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह त्याच्या कारचालकास गुन्हेशाखा युनिट एकने अखेर अटक केली आहे. त्यामुळे स्वत:चे जंगी स्वागत करवून घेणे सराईताला भाेवले असून त्याच्या साथीदारांचा शाेध सुरु झाला आहे. हर्षद सुनील पाटणकर (वय २६, रा. बेथेलनगर, शरणपूर राेड) असे सराईताचे नाव असून त्याचा एसयुव्ही कारचा चालक नरेश उर्फ पवन माणिक कसबे (वय ३१, रा. यशराज प्राईड, ध्रुवनगर) यालाही अटक झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करुन परतताच तडिपाराची जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

तडीपारी (Tadipaar) करुनही वर्तनात सुधारणा न झाल्याने जुलै २०२३ मध्ये तत्कालिन पाेलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी हर्षद पाटणकर याला वर्षभर तुरुंगात स्थानबद्ध केले हाेते. दरम्यान, मंगळवारी (दि. २३) स्थानबद्घतेचा कालावधी पूर्ण झाल्याने पाटणकरची जेलमधून सुटका झाली. त्यामुळे त्याचे जंगी स्वागत करण्यासाठी तडिपार मित्र संशयित गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तीसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे (सर्व रा. बेथेलनगर, शरणपूर) यांनी मिरवणुकीचे नियाेजन करत शरणपूर राेड परिसर गाठला.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : निवृत्त महिला ब्रिगेडिअरचे दीड काेटी लांबविले

यानंतर दुपारी तीन वाजता बेथेल नगर ते आंबेडकर चाैक आणि साधुवासवानी राेडजवळ एक्सयुव्ही ३०० (एमएच १५ जीएक्स ८७२१) कार बाेलवून तिच्या सनरुफमध्ये उभे राहून पाटणकरने मिरवणूकीत सहभाग घेतला. त्याचवेळी त्याच्या कारच्या आजूबाजूला इतर कार व १० ते १५ स्पाेर्ट बाईक, इतर दुचाकी व माेपेडस्वार साथीदार सहभागी झाले. या सर्वांनी परिसरात गाेंगाट करुन अर्वाच्य भाषा वापरुन शिवीगाळ केली. शिवाय दुचाकी वाहनांचे कर्णकर्कश हाॅर्न वाजवून दहशत निर्माण केली.

हे देखील वाचा : नाशिक जिल्हा झाला १५५ वर्षांचा; गौरवशाली क्षणांचा प्रशासनाला पडला विसर

दरम्यान, ही माहिती कळताच सरकरावाडा पाेलीसांनी (SarkarWada Police) दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी संशयित पसार झाले हाेते. त्यांचा शाेध सुरु असतानाच हवालदार प्रशांत मरकड व पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांना मिरवणुकीतील एक्सयूव्ही कार नरेश उर्फ पवन कसबे हा चालवित असल्याचे कळाले. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळविली. त्यानुसार तपास करुन ध्रुवनगर परिसरात शोध घेतला असता पाटणकर व कसबे आढळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. दाेघांचा ताबा सरकारवाडा पोलीसांकडे देण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या